दारूच्या पैशांवरून वडील, भावास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:18 IST2021-03-10T04:18:34+5:302021-03-10T04:18:34+5:30

शहरातील ऑटोचालक शेख नदीम शेख अखिल यांना व त्यांच्या वडिलांना त्यांचा भाऊ शेख मोबीन हा नेहमी दारू पिण्यासाठी पैसे ...

Father, brother beaten for alcohol money | दारूच्या पैशांवरून वडील, भावास मारहाण

दारूच्या पैशांवरून वडील, भावास मारहाण

शहरातील ऑटोचालक शेख नदीम शेख अखिल यांना व त्यांच्या वडिलांना त्यांचा भाऊ शेख मोबीन हा नेहमी दारू पिण्यासाठी पैसे मागायचा. ७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता शेख मोबीन हा वडील व भाऊ शेख नदीम यांना पैसे मागू लागला. त्यावेळी शेख नदीम यांनी पैसे नाहीत. तू नेहमी पैसे मागून त्रास देतोस, म्हणताच शेख मोबीन याने शिवीगाळ सुरू केली. तसेच थापड-बुक्क्यांनी मारहाण करीत बाजूला पडलेला फरशीचा तुकडा उचलून शेख नदीम यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर मारून दुखापत केली. वडील सोडविण्यास आले असता त्यांनाही थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी इतरांनी सोडवासोडव केली. याबाबत शेख नदीम नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी शेख मोबीन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Father, brother beaten for alcohol money