वडिलांनी मुलावर केला कटरने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST2021-09-17T04:22:46+5:302021-09-17T04:22:46+5:30

सेलू तालुक्यातील रवळगाव येथील सुंदर अंबादास मनेरे हे १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घराबाहेर बसले असता, त्यांचे ...

The father attacked the boy with a cutter | वडिलांनी मुलावर केला कटरने वार

वडिलांनी मुलावर केला कटरने वार

सेलू तालुक्यातील रवळगाव येथील सुंदर अंबादास मनेरे हे १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घराबाहेर बसले असता, त्यांचे वडील अंबादास मनेरे आले. त्यांनी सुंदर यांना, मला न विचारता काल तू आणि तुझी बायको घराला कुलूप लावून कुठे गेला होतात, असे विचारले. सुंदर यांनी बहिणीकडे गेल्याचे सांगितल्यानंतर अंबादास मनेरे यांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर घरात जाऊन कटर आणून कटरने डाव्या कानाच्या वरील बाजूस वार केले. यात सुंदर मनेरे यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी इतरांनी येऊन सोडवासोडव केली. याबाबत सुंदर मनेरे यांनी १४ सप्टेंबर रोजी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अंबादास मनेरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The father attacked the boy with a cutter