श्रावणातला उपवास महागला, भगरसह साखरेचे दर वाढले, साबुदाणा, शेंगदाणा स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:22 IST2021-08-25T04:22:54+5:302021-08-25T04:22:54+5:30
परभणी शहरात जवळपास ७०० ते ८०० किराणा दुकाने आहेत. परभणीत साबुदाणा, शेंगदाणा, भगर तसेच साखर या सर्व वस्तू परजिल्ह्यातून ...

श्रावणातला उपवास महागला, भगरसह साखरेचे दर वाढले, साबुदाणा, शेंगदाणा स्थिर
परभणी शहरात जवळपास ७०० ते ८०० किराणा दुकाने आहेत. परभणीत साबुदाणा, शेंगदाणा, भगर तसेच साखर या सर्व वस्तू परजिल्ह्यातून येतात. राज्यातील अकोला, लातूर, जालना येथून साबुदाणा, शेंगदाणा, भगर, तर पश्चिम महाराष्ट्रातील बार्शी, पंढरपूर, सोलापूर या भागातून साखरेची आवक होते. मागील एक महिन्यापासून विविध वस्तूंचे दर वाढले आहेत. यामध्ये श्रावणात उपवासासाठी लागणाऱ्या भगरीचे दर जवळपास १० रुपये किलोला वाढले आहेत, तर साखर किलोला २ ते ३ रुपये महाग झाली आहे. याशिवाय साबुदाणा, शेंगदाण्याचे दर स्थिर असले तरी, ते सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणारे ठरत आहेत.
असे वाढले दर... (प्रति किलो)
श्रावण आधीचे दर
आताचे दर
साबुदाणा ६० रुपये किलो, ६० रुपये किलो
शेंगदाणे १०० रुपये किलो, १०० रुपये किलो
भगर ११० रुपये किलो, १०० रुपये किलो
साखर ३८ रुपये किलो, ३६ रुपये किलो
भगरीचे दर वाढले
परभणीच्या बाजारात श्रावणापूर्वी भगर १०० रुपये किलो होती. ती श्रावण महिना सुरू झाल्यापासून आजपर्यंत ११० रुपये किलो दराने विक्री होत आहे. यामुळे उपवासासाठी लागणाऱ्या भगरीचे दर वाढल्याने ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
मागणी वाढली
दिवसेंदिवस विविध खाद्यपदार्थांचे दर वाढत असले तरी, ग्राहकांची मागणीही वाढत आहे. तसेच जिल्ह्यात होणारी आवकही वाढल्याचे दिसून येते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
साबुदाणा
सध्या साबुदाण्याचा दर ६० रुपये किलो आहे. यामध्ये २ ते ३ प्रकार आहेत. छोटा साबुदाणा व मोठा साबुदाणा अशा दोन प्रकारांमध्ये ग्राहक खरेदी करतात. हे दर मागील काही महिन्यापासून स्थिर आहेत.
शेंगदाणा
जिल्ह्यात शेंगदाणा १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. शेंगदाण्याचा दरही स्थिर आहे. परंतु, ग्राहक खरेदी करताना पूर्वीसारखे जास्तीचा माल घेणे टाळत आहेत.