बायोगॅस योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:39+5:302021-02-06T04:29:39+5:30

पोखर्णी नृसिंह : शेतकऱ्यांनी आपापल्या शेतावर जनावरांचे संगोपन करावे व त्यांच्या शेणापासून गोबरगॅसची निर्मिती करावी. या प्रक्रियेतून गॅस बरोबरच ...

Farmers should take advantage of biogas scheme | बायोगॅस योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

बायोगॅस योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

पोखर्णी नृसिंह : शेतकऱ्यांनी आपापल्या शेतावर जनावरांचे संगोपन करावे व त्यांच्या शेणापासून गोबरगॅसची निर्मिती करावी. या प्रक्रियेतून गॅस बरोबरच उत्कृष्ट सेंद्रिय खत देखील मिळते, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या बायोगॅस योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.

पंचायत समिती व कृषि विभाग मार्फत नृसिंह पोखर्णी येथील बायोगॅस (गोबरगॅस) सयंत्र बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून, सदरील गोबरगॅस सयंत्रची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवनांद टाकसाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, कृषि विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी केली. यावेळी बायोगॅसचे झालेले काम पाहून समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विस्तार अधिकारी कृषि पंचायत समिती यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकरी परमेश्वर वाघ, कृषी विस्तार अधिकारी नरहरी वाघ, कृषि अधिकारी कुटवाड, ग्रामविकास अधिकारी मधुकर पांचाळ, शेतकरी परमेश्वर वाघ अर्जुन, भास्कर वाघ, ज्ञानोबा वाघमारे, अतुल पुजारी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Farmers should take advantage of biogas scheme