शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

परभणीत शेतकऱ्यांचा आक्रोश; हेक्टरी ५० हजार शासकीय मदतीसाठी मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:23 IST

मोर्चात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली.

- मारोती जुंबडेपरभणी: यंदा सप्टेंबर महिन्यात ढगफुटी, जोरदार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची शासकीय मदत दिली जावी. यासाठी जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांनी शुक्रवारी शासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला.

यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून आर्थिक तुटवडा जाणवतो आहे. तरीही शासनाने शेतकऱ्यांसाठी फक्त हेक्टरी ८,५०० रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे, जी अत्यंत अपुरी ठरते. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पसरला आहे. शेतकऱ्यांनी तीन हेक्टरपर्यंत अनुदानाची मर्यादा वाढवावी, प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील तीन बंद ट्रिगर सुरू करावेत, रासायनिक खते, बियाणे व औषधींचे भाव कमी करावेत अशा मागण्या केल्या. हा मोर्चा जिंतूर रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकातून सुरू झाला आणि जिल्हा सामान्य रुग्णालय मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी पार्क, नारायण चाळ मार्गे थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. या मोर्चात जिल्हाभरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळालेच पाहिजे, अशी मागणी केली. या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या मोर्चामध्ये जिल्हाभरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

स्वाभिमानी शेतकऱ्यांचा रूमनं मोर्चा...पंतप्रधान पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर नुकसान भरपाई मिळावी, तसेच चार ट्रिगर या योजनेत समाविष्ट करावेत, या मागणीसाठी शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसमत रस्त्यावरील खानापूर फाटा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर रूमनं मोर्चा काढला. हा मोर्चा वसमत रस्त्यावरील खानापूर फाटा परिसरातून सुरू झाला आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. येथे शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाविरुद्ध आपला संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांनी कोणत्याही अटी-शर्ती न ठेवता सर्व प्रकारच्या कर्जाची संपूर्ण माफी, एम.एस.पी. पेक्षा कमी बाजारभाव असलेल्या सोयाबीन, कापूस, तूर व इतर खरीप पिकांची एम.एस.पी. नुसार आठ दिवसांत खरेदी सुरू करावी, तसेच ऊस उत्पादकांच्या प्रति टन १५–२० रुपये कपातीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी केली. या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, हेमचंद्र शिंदे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, विश्वंभर गोरवे, मुंजा प्रसाद गरुड, नागेश दुधाटे, हनुमान आमले, विठ्ठल चौकट, किशन शिंदे, पंडित भोसले, माऊली शिंदे, नामदेव काळे, विकास भोपाळे आणि पि.टी. निर्वळ यांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Farmers Protest: Demand ₹50,000/Hectare Aid After Crop Loss.

Web Summary : Parbhani farmers protested, demanding ₹50,000/hectare compensation for crop damage due to heavy rains. They criticized insufficient government aid and urged increased subsidy limits. Swabhimani Shetkari Sanghatana also protested, seeking fair crop prices and loan waivers.
टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र