शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना युरिया मिळेना, दुसरीकडे ट्रकभरून खत दुसऱ्या जिल्ह्यात विक्रीला नेताना पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:19 IST

पाथरीत अवैधरित्या युरियाची वाहतूक करणारा ट्रक पकडला; चालकासह मानवतच्या ‘महेश कृषी सेवा केंद्र’ मालकावर गुन्हा दाखल

- विठ्ठल भिसेपाथरी : मानवत शहरातील एका कृषी दुकानदाराच्या गोडाऊनमधील २५० युरिया खताच्या बॅगा अवैधरित्या जालना जिल्ह्यात घेऊन जाणारा ट्रक  8 डिसेंबर रोजी पाथरी ते आष्टी रस्त्यावर पकडण्यात आला. या प्रकरणी ट्रक चालक व कृषी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी दबाव गटाचे प्रमुख रामप्रसाद बोराडे (रा. सेलू) हे पाथरी–आष्टी रस्त्यावरून जात असताना ट्रक संशयास्पद दिसला. त्यांनी ट्रक थांबवून भरारी पथकाला माहिती दिल्यानंतरच कारवाई सुरू झाली. दरम्यान, पाथरी येथील  कृषी अधिकारी (गुण नियंत्रक ) एस. एम. फुलपगार यांनी या बाबत पाथरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाला माहिती मिळाली होती की, परभणी जिल्ह्यासाठी पुरवठा केलेले खत एका ट्रकमधून जालना जिल्ह्यात नेला जात आहे. या माहितीच्या आधारे पाथरी येथील कृषी अधिकारी फुलपगार सारोळा शिवारात थांबले. संशयास्पद ट्रक (MH 46 F 2388 ) दिसताच थांबवून चौकशी करण्यात आली. दरम्यान, ट्रक चालक समीर शेख (रा. छत्रपती संभाजीनगर) याने ट्रकमध्ये युरिया खत असल्याचे कबूल केले.

250 बॅग सापडल्या, कागदपत्रांचा अभावघटनेची माहिती मिळताच  जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख दीपक सामाले, जिल्हा गुणनियंत्रक गोविंद काळे, मानवत कृषी अधिकारी मनोज लांबडे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या उपस्थितीत ट्रॅकची  तपासणी केली असता २५० युरिया बॅग (प्रति बॅग ४५ किलो) सापडल्या. मात्र कोणतेही वैध परवाना अथवा कागदपत्र ट्रॅक चालकाकडे आढळून आले नाहीत, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. चालकाने चौकशीत सांगितले की हे खत महेश कृषी सेवा केंद्र, मानवत येथील गोडाऊनमधून घेऊन पाथरी तालुक्यातील काही गावांमध्ये पोहोचविण्यास सांगितले होते. 

खत वाढीव दराने विक्रीचा संशयभरारी पथकाने पंचनाम्यात नमूद केले की, हे खत वाढीव दराने विक्री अथवा औद्योगिक वापरासाठी परजिल्ह्यात नेले जात होते असा संशय आहे. या प्रकरणात कृषी दुकानाचे मालक पुरूषोत्तम दशरथलाल चांडक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यापूर्वी राजकीय दबावतंत्र?सायंकाळी पंचनामा करून ट्रक पाथरी पोलीस ठाण्यात आणला असतानाही गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. यामागे राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, अशी चर्चा रंगली. कृषी दुकानदाराला कोण पाठबळ देत होते? असा प्रश्न उपस्थित.

शेतकऱ्यांना खत टंचाई, मात्र ट्रक भरून बाहेरगावी?एकीकडे शेतकऱ्यांना युरिया खत वेळेवर मिळत नाही, कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते, तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यासाठीचे खत सर्रास जालना जिल्ह्यात औद्योगिक वापरासाठी पाठवले जाते. मोठ्या प्रमाणावर साठा असतानाही कृषी विभागाला याची माहिती होत नाही कशी? यातून साखळी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers face urea shortage; truckload seized en route to another district.

Web Summary : Urea fertilizer shortage hits farmers. A truck carrying 250 bags was seized while illegally transporting it to Jalna district. Police filed a case against the truck driver and shop owner for illegal transport and suspected black market sales.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी