शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कन्येचे UPSC मध्ये यश; डॉ. रोमा तांबोळीची दिल्लीत वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:52 IST

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतलेल्या आरोग्य विभागाच्या स्पर्धा परीक्षेत देशात १४ वा आणि महाराष्ट्रातून अव्वल क्रमांक

- प्रमोद साळवेगंगाखेड: तालुक्यातील राणीसावरगाव या छोट्याशा गावातून एक मोठी आणि प्रेरणादायी झेप घेत अवघ्या २७ व्या वर्षी डॉ. रोमा मुजमील तांबोळी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतलेल्या आरोग्य विभागाच्या स्पर्धा परीक्षेत देशात १४ वा आणि महाराष्ट्रातून अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे गाव, तालुका आणि जिल्ह्यात अभिमानाची भावना ओसंडून वाहत आहे.

डॉ. रोमा यांनी आपले प्राथमिक शिक्षण ग्रामीण पार्श्वभूमीत घेतले. पुढे बी.ए.एम.एस. शिक्षण नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेच्या जगात आपली क्षमता आजमावण्याचा निर्धार त्यांनी केला आणि नागपूर येथे UPSC स्पर्धा परीक्षेची कठोर तयारी सुरू केली. यापूर्वी त्या एम.डी. अभ्यासक्रमासाठी पात्र ठरल्या होत्या, पण त्यांचे लक्ष्य मोठे होते. देशसेवेच्या माध्यमातून जनतेचे आरोग्य जपणारे पद मिळवणे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन करत नवी दिल्ली येथील केंद्रीय सरकारी आस्थापना विभागात वर्ग-१ वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती मिळवली आहे. बुधवारी दि.१३ रोजी सायंकाळी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. ग्रामीण भागात जडणघडण झालेली ही डॉक्टर आता देशाच्या आरोग्य व्यवस्थेत आपली सेवा देणार आहे.

कुटुंबाचा संघर्ष आणि प्रेरणादायी यशडॉ. रोमा या मुजमील सरवर तांबोळी यांच्या कन्या आहेत. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून साऊंड सर्व्हिसचा व्यवसाय करतात. सहा मुलींना उच्च शिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी केला आणि त्यासाठी प्रत्येक संकटाशी सामना केला. आज त्या सहा मुलींमधील डॉ.सिफाना, डॉ.रोमा व डॉ.अर्शनाज या तीन मुली डॉक्टर, अंजुम ही बँक मॅनेजर, सुनेला ही केमिकल इंजिनीअर, धाकटी मुलगी सानिया ही बी.टेक. प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. मोठी मुलगी डॉ. शिफा तांबोळी एमबीबीएस, एमडी स्त्रीरोगतज्ज्ञ असून उमरगा (जि. धाराशिव) येथे तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

मुलींसाठी प्रेरणेचा दीपस्तंभगावाचे माजी सरपंच अल्ताफ सय्यद सांगतात की, "मुजमील तांबोळी यांनी मुलींना मुलांसारखेच नव्हे, तर त्याहूनही अधिक संधी दिल्या. त्यांच्या कष्टामुळे आज तांबोळी कुटुंबाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे." डॉ. रोमा तांबोळींचा हा प्रवास ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना एक नवा आत्मविश्वास देणारा आहे. मेहनत, चिकाटी आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल, तर कोणतेही स्वप्न गाठता येते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या यशामुळे राणीसावरगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकले आहे आणि अनेक मुलींना नव्या उंचीची स्वप्ने पाहण्याची हिंमत मिळाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षणFarmerशेतकरी