शेतातील दुचाकी गेली चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST2021-04-14T04:16:03+5:302021-04-14T04:16:03+5:30
पाथरी : तालुक्यातील मंजरथ शिवारात एका शेतात उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून, ...

शेतातील दुचाकी गेली चोरीस
पाथरी : तालुक्यातील मंजरथ शिवारात एका शेतात उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सोमवारी पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाथ्रा येथील शेतकरी राजेभाऊ ज्ञानोबा येवले यांनी त्यांची एमएच २० बीजे ४२५० क्रमांकाची दुचाकी १० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता शेतात एका बाजुला उभी केली होती. त्यानंतर ते उसाला पाणी देण्यासाठी गेले. सायंकाळी ५ वाजता ते परत आले असता, त्यांना जागेवर दुचाकी दिसून आली नाही. याबाबत त्यांनी शोध घेतला असता ती आढळून आली नाही. त्यामुळे पाथरी पोलीस ठाण्यात त्यांनी १२ एप्रिल रोजी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.