शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हसऱ्या लग्नाची, फसवी गोष्ट; बोगस लग्नाचा विस्तार मात्र चार जिल्ह्यांत; एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:20 IST

कोल्हापूर-सोलापूर अन् लातूरच्या एजंटांकडून मोठी फसवणूक

परभणी : नवरदेव पुण्याचा, नवरी पालमची… लग्न जुळविले इचलकरंजीकरांनी, स्थळ दाखविले कोल्हापुरातल्या वधू-वर सुचकांनी, व्यवहार झाले लातूरकरांच्या उपस्थितीत आणि लग्न लावले परभणी जिल्ह्यातील केरवाडी येथे. या चार जिल्ह्यांत पसरलेली ही सर्व ‘जुळवाजुळवीचा’ शेवट अंबाजोगाईमध्ये झाला. आता पळून गेलेल्या नवरीसह चार जिल्ह्यातील नेटवर्क शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

ही घटना सिनेमातील प्रसंगाला साजेशी असली तरी घडली मात्र थेट वास्तवात. स्वारगेट, पुणे येथील किरण मोरे याचे लग्न जुळविण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून या फसवणुकीची गुंतागुंत उघड झाली. मोरे कुटुंब दोन-तीन वर्षांपासून मुलगा किरणसाठी स्थळ शोधत होते. शेजाऱ्याच्या ओळखीतून इचलकरंजी येथील वधू-वर सुचक रंजना मोरे व जया कान्हेगावकर यांच्याशी संपर्क आला. काही स्थळे दाखविल्यानंतर रंजना हिने कोल्हापुरातील विनायक जाधव याचे नाव सांगितले. त्याच्याद्वारे सरला मधुकर कोलते नावाच्या मुलीचे फोटो, आधार कार्ड पाठवण्यात आले आणि स्थळ आवडले. एवढ्यावरून पुढे व्यवहारही सुरू झाले. सरलाच्या नातेवाईक म्हणून सांगोल्यातील नवनाथ बंडगीरे याची एंट्री झाली. त्याच्यासह विनायक जाधव, रंजना मोरे, जया कान्हेगावकर आणि लातूर जिल्ह्यातील रेखा सूर्यवंशी, तौफीक, बेबीजान शेख, बबन काकडे असे अनेक जण यात सामील असल्याचे पुढे स्पष्ट झाले. मुलगी गरीब असल्याने लग्नाचा खर्च १.५ लाख रुपये आणि प्रत्येकी एजंटांना १० हजार लागतील, अशी माहिती मोरे कुटुंबाला देण्यात आली. अखेर विचारांती विवाहाला सहमती देत पुण्यातून फोनपेवर २१ हजार टाकून सुरुवात झाली.

मुलगी पाहणीचा ‘टूर’ अन् केरवाडीत लग्न२ डिसेंबरला रात्री कुटुंब इचलकरंजीकरांच्या सांगण्यावरून तुळजापूर- लातूर - पालम असा प्रवास करून पालममध्ये मुलगी सरला कोलते हिला पाहण्यासाठी गेले. मुलगी, तिची आई आणि मावस बहीण यांच्या उपस्थितीत पाहणी झाल्यानंतर पुढील दिवशी केरवाडी (ता. पालम) येथील मारोती मंदिरात साधे लग्न लावण्यात आले. लग्न संपताच नवनाथ बंडगीरे व विनायक जाधव यांनी पैशांची मागणी केली. कुटुंबाने २,१०,००० रुपये रोख आणि ८०,००० रुपये गुगल पेवरून दिले. एवढे देणे-घेणे झाल्यानंतर सर्वजण पुण्याच्या दिशेने निघाले.

अन् अंबाजोगाईत ‘क्लायमॅक्स’अंबाजोगाईजवळील एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले असता नवरा किरण आणि त्याची आई ढाब्यात गेली. कारमध्ये मुलगी व शेजारी बसले होते. तेवढ्यात नवरी सरला आणि तिची मावस बहीण गाडीतून उतरून समोरच तयार उभ्या पांढऱ्या कारमध्ये बसल्या आणि काही क्षणांत गायब झाल्या. मोरे कुटुंब अवाक् झाले आणि तेव्हा कळले चार जिल्ह्यांत विखुरलेली ही ‘एजंटांची टोळी’ संगनमताने फसवणूक करत होती.

व्याप्तीने गुंता वाढला; ११ जणांविरुद्ध गुन्हेया प्रकरणात चार जिल्ह्यांतील एकूण ११ जणांवर संगनमताने विवाहाच्या नावाखाली २.९० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पालम पोलिसांनी तपास सुरू केला असून या टोळीची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake marriage racket busted: Bride flees, 11 booked across four districts.

Web Summary : A groom from Pune was defrauded in a fake marriage scheme spanning four districts. The bride fled after the wedding, leading to the arrest of 11 individuals involved in the elaborate scam, which involved multiple agents and a staged wedding in Parbhani.
टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीlaturलातूर