रस्ते, पुलांच्या कामाच्या निविदेची मुदत वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST2021-04-12T04:15:58+5:302021-04-12T04:15:58+5:30
राज्यात कोरोनामुळे विविध विकासात्मक कामे पूर्ण करण्यास अडथळा येत आहे. अशा स्थितीत पंचायत राज संस्थांमार्फत करण्यात येणारी ग्रामीण भागातील ...

रस्ते, पुलांच्या कामाच्या निविदेची मुदत वाढविली
राज्यात कोरोनामुळे विविध विकासात्मक कामे पूर्ण करण्यास अडथळा येत आहे. अशा स्थितीत पंचायत राज संस्थांमार्फत करण्यात येणारी ग्रामीण भागातील रस्ते व पुलाची कामे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांची जाहीर ई-निविदा काढणे, संबंधित प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणे, प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश देणे ही प्रक्रिया त्वरेेने पूर्ण करण्यासाठी अल्पावधीची निविदा काढण्याच्या कामास ३१ मार्चपर्यंत ग्रामविकास विभागाने मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपली असून, या संदर्भातील आणखी अनेक कामे प्रलंबित असल्याने अल्प कालावधीच्या निविदाप्रक्रियेस ३१मेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे याच कालावधी ही कामे पूर्ण करावीत, १ जून रोजी ही मुदतवाढ आपोआप रद्द होईल, असे यासंदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.