हळद लागवडीसंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST2021-02-15T04:15:54+5:302021-02-15T04:15:54+5:30

परभणी : पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथे आत्मा अंतर्गत घेण्यात आलेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांना हळद लागवड ते काढणीपश्चात तंत्रज्ञान ...

Expert guidance on turmeric cultivation | हळद लागवडीसंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

हळद लागवडीसंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

परभणी : पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथे आत्मा अंतर्गत घेण्यात आलेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांना हळद लागवड ते काढणीपश्चात तंत्रज्ञान या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयातील उपनिदेशक बी. एन. झा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. अध्यक्षस्थानी ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक एस. बी. आळसे तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी डी. डी. काळे उपस्थित होते. काळे यांनी हळद लागवड तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठातील डॉ. यु. एन. आळसे यांनी हळद काढणी व साठवण, ‘माविम’चे जिल्हा समन्वयक अधिकारी अंभोरे यांनी ‘उद्योजकता विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कावलगाव येथील नारायण पिसाळ, जिल्हा परिषद सदस्य अरुणा सोनटक्के उपस्थित होत्या. तालुका कृषी अधिकारी आर. एच. तांबिले यांनी प्रास्ताविक केले तर व्ही. एस. जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील जगन्नाथ, गोविंद पुरे, मंडल कृषी अधिकारी वाघमोडे आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Expert guidance on turmeric cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.