हळद लागवड संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:16 IST2021-02-14T04:16:13+5:302021-02-14T04:16:13+5:30
भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयातील उपनिर्देशक बी.एन. झा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी आत्माचे प्रकल्प संचालक एस.बी. आळसे ...

हळद लागवड संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
भारत सरकारच्या उद्योग मंत्रालयातील उपनिर्देशक बी.एन. झा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी आत्माचे प्रकल्प संचालक एस.बी. आळसे तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी डी.डी. काळे यांची उपस्थिती होती. काळे यांनी हळद लागवड तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठातील डॉ.यु.एन. आळसे यांनी हळद काढणी व साठवण, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी अंभोरे यांनी उद्योजकता विकास या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कावलगाव येथील नारायण पिसाळ, जि.प. सदस्य अरुणाताई सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. तालुका कृषी अधिकारी आर.एच. तांबिले यांनी प्रास्ताविक केले. व्ही.एस. जोशी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील जगन्नाथ, गोविंद पुरे, मंडळ कृषी अधिकारी वाघमोडे आदींनी प्रयत्न केले.