परभणी जिल्ह्यात ३१ मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:12 AM2021-07-23T04:12:33+5:302021-07-23T04:12:33+5:30

परभणी : जिल्ह्यातील ५२ महसुली मंडळांपैकी ३१ मंडळामध्ये बुधवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात दाणादाण उडाली असून, जिल्हा आणि तालुक्याचे ...

Excessive rainfall in 31 circles in Parbhani district | परभणी जिल्ह्यात ३१ मंडळात अतिवृष्टी

परभणी जिल्ह्यात ३१ मंडळात अतिवृष्टी

Next

परभणी : जिल्ह्यातील ५२ महसुली मंडळांपैकी ३१ मंडळामध्ये बुधवारी रात्री अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात दाणादाण उडाली असून, जिल्हा आणि तालुक्याचे मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाले आहे. ओढ्याचे पाणी गावात शिरल्याने काही गावात ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे.

बुधवारी सकाळपासूनच पावसाला प्रारंभ झाला. मात्र रात्री पावसाने जोर पकडला. हळूहळू सर्वच भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून, जागोजागीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. जिल्ह्यात सरासरी ७० मिमी. पाऊस झाला आहे. ६५ मिमी. पेक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पावसाचा विचार करताना परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळात सर्वाधिक ९५.३ मिमी. पाऊस झाला असून, सर्वात कमी पाऊस याच तालुक्यातील पिंगळी मंडळात ३५ मिमी. पाऊस झाला आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे परभणी शहराला जोडणारे पालम- परभणी, पाथरी-परभणी, गंगाखेड- परभणी, ताडकळस- परभणी या प्रमुख मार्गावर पाणी असल्याने परभणीशी संपर्क तुटला आहे. तर तालुक्याला जोडणाऱ्या बहुतांश मार्गावर पाणी असल्याने संपर्क तुटला आहे.

धरणांचे उघडले दरवाजे

या पावसामुळे धरणांत पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्याचे ३, मुदगल बंधाऱ्याचे २ आणि तारुगव्हाण बंधाऱ्याचे २ दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पूर्णा, गोदावरी या दोन्ही नद्या दुथडी भरुन वाहत असून, येलदरी धरणाच्या वरच्या भागात अतिवृष्टी झाल्याने या प्रकल्पात ही पाण्याची आवक वाढली आहे. सध्या प्रकल्पात ६१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

या मंडळात झाली अतिवृष्टी

परभणी ९३.५ मिमी., पेडगाव ८२, जांब ८०, झरी ७७.३, सिंगणापूर ९५.३, परभणी ग्रामीण ८०.८, टाकळी कुंभकर्ण ८५, राणीसावरगाव ६५.३, पाथरी ९५.८, बाभळगाव ७५.३, कासापुरी ७१.३, जिंतूर ८१, बामणी ९७, बोरी ७८.५, चारठाणा ८०.५, वाघी धानोरा ७७, ताडकळस ८१.३, लिमला ७४.८, चुडावा ६६.३, पालम ६७, बनवस ६८, देऊळगाव ८५.३, सेलू ९०.५, वालूर ७८.३, कुपटा ८०.५, चिकलठाणा ७५.३, मोरेगाव ८९.५, मानवत ९५.३, केकरजवळा ८७.५, कोल्हा ८४.५, ताडबोरगाव ६७.३ मिमी.

Web Title: Excessive rainfall in 31 circles in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app