कर्जबाजारी झाल्याने माजी सरपंचाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:13 IST2021-06-11T04:13:19+5:302021-06-11T04:13:19+5:30
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक या बँकेकडून घेतलेले कर्ज आणि खासगी कर्ज कसे फेडावे, या चिंतेने ज्ञानदेव ...

कर्जबाजारी झाल्याने माजी सरपंचाची आत्महत्या
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक या बँकेकडून घेतलेले कर्ज आणि खासगी कर्ज कसे फेडावे, या चिंतेने ज्ञानदेव नरुटे (वय ४७) हे मागील काही दिवसांपासून तणावात होते. दरम्यान, ६ जून रोजी त्यांनी विषप्राशन केले. ही माहिती समजताच त्यांना परभणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती सुधारत होती. मात्र ९ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ज्ञानदेव नरुटे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे ते कट्टर समर्थक होते. ज्ञानदेव नरुटे हे २०१० ते २०२० पर्यंत हनवतखेडा ग्रामपंचायतीचे सरपंचपदावर कार्यरत होते. जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नरुटे यांच्या पॅनालचा पराभव झाल्याने त्यांची ग्रामपंचायतीमधील सत्ता संपुष्टात आली होती.