लाँकडाऊन संपला तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:24+5:302021-05-16T04:16:24+5:30
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. यामध्ये ज्येष्ठांसह नागरिकांचा समावेश आहे. आता कोरोनाचा संभाव्य धोका तिसऱ्या लाटेत ...

लाँकडाऊन संपला तरी, मुलांना घराबाहेर सोडू नका
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. यामध्ये ज्येष्ठांसह नागरिकांचा समावेश आहे. आता कोरोनाचा संभाव्य धोका तिसऱ्या लाटेत शून्य ते १८ वर्ष वयोगटातील बालक, तरुणांना असल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. लाँकडाऊन संपल्यावर लहान मुलांच्या बाबत काळजी घेताना पालकांनी सजग राहणे गरजेचे आहे.
कोरोनाचे १८ वर्षाखालील रुग्ण - ३७७०
दुसऱ्या लाटेतील रुग्ण - ३७.४६६
१० वर्षापेक्षा कमी वयाचे रुग्ण - १२८३
बाल रुग्णांसाठी ४५० खाटा वाढणार
जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेता बालकांवर उपचार करण्यासाठी ४५० खाटा तयार ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात चौथ्या मजल्यावर केवळ मुलांसाठी ४०० ऑक्सीजन बेड व जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र बालरुग्ण कक्षात ५० बेड तयार केले जाणार आहेत. यासाठी बालरोग तज्ज्ञ, लागणारी औषधी यांचा आढावा प्रशासनाने घेतला आहे.
पालकांनी घ्यावी ही काळजी
लहान मुलांना थंड पाण्याने अंघोळ घालू नये
थंड पदार्थ खाण्यासाठी देऊ नयेत.
सकस आहार तसेच गरम आणि ताजे अन्न द्यावे
घरात वयस्कर कोणी बाधित असेल तर त्यांचा बालकांशी येणारा संपर्क टाळावा
ही आहेत लक्षणे
मुलांमध्ये सुस्तपणा जाणवणे, खेळणे-बागडणे कमी होणे. ताप, सर्दी, खोकला असल्यास दूर्लक्ष करु नये.
लस येइपर्यंत काळजी घ्यायलाच हवी
लहान मुलांच्या बाबत त्यांना अचानक आलेला ताप, सर्दी, खोकला याच्याकडे दूर्लक्ष करु नये. न्यूमोनियाची लक्षणे वाटल्यास त्यांची तपासणी करावी. मास्क लावल्याशिवाय मुलांना घराबाहेर नेऊ नये. - डाँ. श्याम जेथलिया, बालरोग तज्ज्ञ.