शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
2
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
3
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
4
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
5
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
6
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
7
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
8
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
9
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
10
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
11
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
12
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
13
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
14
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
15
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
16
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
17
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
18
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
19
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
20
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही डॉक्टरकीचा धर्म पाळला; डॉ.धनंजय काळेंच्या अवयवदानामुळे ६ जणांना 'नवजीवन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:14 IST

माझा मुलगा गेला, पण इतरांच्या रूपात जगेल!"; काळे परिवाराच्या दातृत्वाला सलाम

- कृष्णा काळे

पूर्णा ( परभणी) : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जालन्यात माणुसकीचा एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग अनुभवायला मिळाला. पुणे येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे तरुण डॉक्टर धनंजय अनंत काळे (रा. एरंडेश्वर, ता. पूर्णा) यांचा अपघातात मेंदूमृत (Brain Dead) झाला. मात्र, या प्रचंड दुःखाच्या प्रसंगातही काळे कुटुंबाने मोठे मन दाखवत धनंजयचे अवयव दान करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे तब्बल सहा रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहे.

अपघात अन् डॉक्टरकीची अखेरची सेवा धनंजय काळे हे पुण्याहून परीक्षेसाठी जालना येथे आले होता. परत जात असताना छत्रपती संभाजीनगर चौफुलीजवळ त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. जालन्यातील संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांकहा मेंदूमृत घोषित केला. डॉक्टर मुलाचे समाजसेवेचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतला.

ग्रीन कॉरिडॉर अन् सहा जणांना जीवदान जालना पोलिसांच्या मदतीने १ जानेवारी रोजी तातडीने 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करण्यात आला. धनंजय यांचे दोन मूत्रपिंड, दोन फुफ्फुसे, एक यकृत आणि डोळ्यांचे बुबुळ असे सहा अवयव तातडीने छत्रपती संभाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयांत पोहोचवण्यात आले. यामुळे सिग्मा हॉस्पिटल, हेडगेवार रुग्णालय आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील सहा गरजू रुग्णांचे प्राण वाचले आहेत. जालना जिल्ह्यातील हा पहिलाच मोठा अवयवदानाचा प्रसंग असल्याचे सांगितले जात आहे. धनंजय यांनी स्वतः डॉक्टर म्हणून समाजहितासाठी सेवा देण्याचे स्वप्न पाहिले होते, ते त्यांनी मृत्यूनंतर देखीलही आपल्या देहाच्या रूपाने पूर्ण केले आहे.

यांचे प्रयत्न आले कामीजालना जिल्ह्यातील हा पहिलाच अवयवदानाचा प्रसंग असल्याचे सांगण्यात येत असून या वेळी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी व नागरिकांनी श्वास रोखून हा क्षण अनुभवला. या संपूर्ण प्रक्रियेसाठी डॉ. बळीराम बागल, डॉ. रजनीकांत जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, धनंजयचे वडील अनंत काळे, रितेश काळे व डॉ. वझरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

English
हिंदी सारांश
Web Title : Doctor's organ donation after death gives 'new life' to six.

Web Summary : Dr. Dhananjay Kale's family donated his organs after a fatal accident. His selfless act saved six lives through a green corridor, providing new hope to patients needing transplants.
टॅग्स :Organ donationअवयव दानparabhaniपरभणीJalanaजालनाAccidentअपघात