शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे होणार लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:30 IST2021-02-18T04:30:38+5:302021-02-18T04:30:38+5:30

अनेक वर्षांपासून पूर्णा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, अशी शिवप्रेमी जनतेची मागणी होती. ...

The equestrian statue of Lord Shiva will be dedicated | शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे होणार लोकार्पण

शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे होणार लोकार्पण

अनेक वर्षांपासून पूर्णा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, अशी शिवप्रेमी जनतेची मागणी होती. खा. संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, नगराध्यक्ष गंगाबाई एकलारे, संतोष एकलारे, पालिकेचे सर्व सदस्य यांनी लोकवर्गणीचे काम सुरू होते. हे काम पूर्णत्वास गेले असून, शुक्रवारी शिवजन्मोत्सवदिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा बसवून त्याचा लोकार्पण सोहळा खा. संजय जाधव यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, नगराध्यक्ष गंगाबाई एकलारे, उपनगराध्यक्ष विशाल कदम आदींची उपस्थिती राहणार आहे. या लोकार्पण सोहळ्यास शिवप्रेमी जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन संतोष एकलारे यांनी केले आहे.

Web Title: The equestrian statue of Lord Shiva will be dedicated