उद्योजकांनी आत्मनिर्भर भारत योजनेत सहभागी व्हावे, - प्रदीप पेशकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST2021-05-12T04:17:53+5:302021-05-12T04:17:53+5:30

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र महिला उपसमितीतर्फे महिलांसाठी, व्यापार-उद्योग संबंधित ऑनलाईन व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळा व ...

Entrepreneurs should participate in Atmanirbhar Bharat Yojana, - Pradip Peshkar | उद्योजकांनी आत्मनिर्भर भारत योजनेत सहभागी व्हावे, - प्रदीप पेशकर

उद्योजकांनी आत्मनिर्भर भारत योजनेत सहभागी व्हावे, - प्रदीप पेशकर

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या उत्तर महाराष्ट्र महिला उपसमितीतर्फे महिलांसाठी, व्यापार-उद्योग संबंधित ऑनलाईन व्यावसायिक मार्गदर्शन कार्यशाळा व वेबिनार झाले. यावेळी देशकार बोलत होते. या वेबिनारमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपसमितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे, उपाध्यक्ष ललित गांधी, भाजप उद्योग आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष समीर दुधगावकर, अनिलकुमार लोढा, शुभांगी तिरोडकर, संजय दादलिका, सागर नागरे, विनी दत्ता आदींचा सहभाग होता. यावेळी पेशकार यांनी ‘वोकल फॉर लोकल, वन डिस्ट्रिक वन प्रोडक्ट’ या योजनांचीही माहिती दिली. तसेच सर्वांनी सरकारच्या योजनांची माहिती करून घ्यावी व आत्मनिर्भर भारत योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. मंडलेचा यांनी महाराष्ट्र चेंबरतर्फे व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांची, योजनांची माहिती दिली. आभार दुधगावकर यांनी मानले.

Web Title: Entrepreneurs should participate in Atmanirbhar Bharat Yojana, - Pradip Peshkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.