शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सेल्समन बनून घरात शिरला, संधीसाधत केला विनयभंग; आरोपीस चार वर्ष सश्रम कारावास

By राजन मगरुळकर | Updated: November 29, 2024 19:11 IST

चार साक्षीदार तपासण्यात आले; परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने निकाल देत सुनावली शिक्षा

परभणी : शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ऑगस्ट २०२३ मध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणातील आरोपीस परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एस. नायर यांनी शुक्रवारी कलम आठ पोक्सोमध्ये तीन वर्ष सश्रम कारावास व कलम ४५२ मध्ये एक वर्ष सश्रम कारावास अशी चार वर्ष कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पीडिता व तिची आई ६ ऑगस्ट २०२३ रोजी घरी असताना दुपारी आरोपी गुरमीतसिंग उर्फ रिंकूसियंग रणवीरसिंग टाक हा सेल्समन म्हणून फिर्यादीच्या घरी आला होता. यावेळी त्याने पीडितेचा विनयभंग केला. त्या ठिकाणी पीडिताची आई आली व तिने आरोपीच्या गालावर चापट मारली. तेव्हा आरोपी तेथून पळून गेला. सदर प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एस. एस. नायर यांनी आरोपी गुरमीतसिंग उर्फ रिंकूसियंग रणवीरसिंग टाक (३०, रा. गुरुद्वारा गेट क्रमांक सहा, नांदेड) यास कलम आठ पोक्सोमध्ये तीन वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास आणि कलम ४५२ भादवीमध्ये एक वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या कलमाखाली सुनावल्याचा आदेश देण्यात आला.

या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद गिराम यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सुरेश चव्हाण, अंमलदार दत्तराव खुने, प्रमोद सूर्यवंशी, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.

चार साक्षीदार तपासण्यात आलेसदर प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांनी तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता व तिची आई यांची नायब तहसीलदार यांच्यासमोर झालेली ओळख परेड व पीडिताने आरोपीस कोर्टात ओळखले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीsexual harassmentलैंगिक छळ