शहरातील रस्त्यावर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:22 IST2020-12-30T04:22:54+5:302020-12-30T04:22:54+5:30

भाजीपाला अडतीची दुकाने अडचणी गंगाखेड - गंगाखेड शहरात वकिल काॅलनीतील भाजीपाला आडतीच्या जागेवर आणताना नागरिकांना अडचण होत आहे. ...

Encroachment on city streets | शहरातील रस्त्यावर अतिक्रमण

शहरातील रस्त्यावर अतिक्रमण

भाजीपाला अडतीची दुकाने अडचणी

गंगाखेड - गंगाखेड शहरात वकिल काॅलनीतील भाजीपाला आडतीच्या जागेवर आणताना नागरिकांना अडचण होत आहे. त्यामुळे आडत मालकांनी बसस्थानक परिसरातील भगवती मंदिरकडे आडत दुकाने नेली आहेत. याठीकाणीही अरूद रस्त्यामुळे ग्रामीण भागातुन भाजीपाला घेऊन आलेल्या वाहनाची कोंडी होत आहे. वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहन धारकांना तासन- तास अडकुन पडावे लागत आहे.

दुचाकी वाहनाच्या कागदपत्रांची पाहणी

गंगाखेड - शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक व पोलीस स्टेशन, बसस्थानक मार्गावर दुचाकीस्वारानांकडील कागदपत्राची पोलीस पाहणी करीत आहेत. गाडी चालवण्याचा परवाना, गाडीच्या कागदपत्राची पाहणी केली जात आहे. यावर उपाय म्हणून दुचाकीस्वार या मार्गाचा वापर न करता इतर रस्त्याने जात आहेत. कागदपत्रांच्या पाहणीमुळे दुचाकीस्वारांनी धारकानी धास्ती घेतली आहे.

खडीमुळे वाहनधारक त्रस्त

सोनपेठः सोनपेठ- परळी रस्त्यावरील कालव्यावर असलेल्या पुलावर मोठे- मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी त्यामध्ये टाकलेल्या खडीमुळे वाहन चालवताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. महामार्ग प्रधिकरण विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Encroachment on city streets