केंद्र व राज्याच्या धोरणाविरुद्ध कर्मचार्यांनी पाळला विरोध दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:01+5:302021-07-16T04:14:01+5:30
देशभरात महागाईचा झालेला उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारीची वाढलेली समस्या, कामगार कायद्यात बदल करून राबविलेले धोरण, खासगीकरण, कंत्राटीकरण आदी ...

केंद्र व राज्याच्या धोरणाविरुद्ध कर्मचार्यांनी पाळला विरोध दिन
देशभरात महागाईचा झालेला उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारीची वाढलेली समस्या, कामगार कायद्यात बदल करून राबविलेले धोरण, खासगीकरण, कंत्राटीकरण आदी राज्य व केंद्र शासनाच्या धोरणांचा कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदविला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. त्यात राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मंगेश जोशी, सचिव पी. सी. सिरस, जिल्हा संघटक प्रवीण भानेगावकर यांच्यासह सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
काळ्या फिती लावून काम
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातही गुरुवारी राष्ट्रीय विरोध दिन पाळण्यात आला. कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून दिवसभर कामकाज केले. या आंदोलनात जिल्हा पोलीस कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अन्वर शेरदिल पठाण, सरचिटणीस ओमप्रकाश कोटरवार, ग्रीष्मा कदम, दीपक गजभार, आशा देशपांडे, दीपाली पाटील, कविता गुट्टे, मीरा केंद्रे आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.