शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

परभणीत सुरू होणार वीज चोरी शोधणारी यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:21 IST

मीटरमध्ये खाडाखोड करून होणाऱ्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने आता रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सट्रेटर युनिट (डीसीयू) कार्यान्वित केले असून, येत्या काही दिवसात हे युनिट परभणी जिल्ह्यात बसविले जाणार आहे़ त्यासाठी जिल्ह्यातील सिंगल फेज वापणाºया ८९ हजार ४४५ ग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मीटरमध्ये खाडाखोड करून होणाऱ्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने आता रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सट्रेटर युनिट (डीसीयू) कार्यान्वित केले असून, येत्या काही दिवसात हे युनिट परभणी जिल्ह्यात बसविले जाणार आहे़ त्यासाठी जिल्ह्यातील सिंगल फेज वापणाºया ८९ हजार ४४५ ग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत़वीज चोरीला आळा बसावा, यासाठी महावितरण कंपनी अनेक उपाय करीत आहे; परंतु, या उपाययांवर मात करीत विजेची चोरी केली जाते़ मागील काही वर्षापूर्वी वीज चोरीला आळा बसविण्यासाठी नवीन रेडिओ फ्रिक्वेन्सी व इन्फ्रा रेड असे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले़ मात्र त्यातही फेरफार करून वीज चोरी सुरू असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे़ त्यामुळे या वीज चोरीला आळा घालण्यासाठी आता डेटा कॉन्सट्रेटर युनिट कार्यान्वित केले जाणार आहे़त्यामध्ये पूर्वीचे मीटर बदलावे लागणार असून, त्याचा कार्यक्रम महावितरणने हाती घेतला आहे़ जिल्ह्यातील सहा शहरांमधील ८९ हजार ४४५ ग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत़त्यामध्ये परभणी शहरातील ५२ हजार ३९८, पूर्णा शहरातील ५ हजार २३९, गंगाखेड शहरातील ९ हजार ३४२, जिंतूर शहरातील ६ हजार ९३८, पाथरी शहरातील ५ हजार ३७१ आणि सेलू शहरातील १० हजार १५७ ग्राहकांचे मीटर बदलले जाणार आहेत, अशी माहिती महावितरणने दिली़कसे काम करते डीसीयू युनिट...?४रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सट्रेटर हे युनिट मानव विरहित असून, या प्रणालीद्वारे ग्राहकांच्या मीटरचे अचूक वाचन नोंदविले जाते़ त्यामुळे ग्राहकांची वीज बिलांबाबत तक्रार राहणार नाही़ तसेच या प्रणालीमध्ये ग्राहकांच्या मिटर रेडींग उपलब्ध होत असून, प्रत्येक १५ मिनिटाला ग्राहक किती विजेचा वापर करीत आहे, याची माहितीही उपलब्ध होणार आहे़४त्याच प्रमाणे वीज पुरवठा करणाºया रोहित्रावरील विजेचा भारही निदर्शनास येणार आहे़ या प्रणालीच्या अचूक मीटर वाचनामुळे एखादा वीज ग्राहक वीज चोरी करीत असेल तर त्याची माहितीही केंद्रीय सर्व्हरमधून मिळते़ त्यामुळे ग्राहकांकडून होणाºया वीज चोरीला आळा बसणार आहे़ या प्रणालीद्वारे ग्राहकांच्या मीटर रीडिंगची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली़लातूरमध्ये वीज चोरी उघड४हे युनिट लातूर जिल्ह्यात कार्यान्वित केले असून, एप्रिल आणि मे महिन्यात लातूरमधील ३८ ग्राहक मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करीत असल्याची माहिती केंद्रीय बिलिंग प्रणालीमध्ये दिनांक व वेळेसहित उपलब्ध झाली़४त्यामुळे या ग्राहकांवर महावितरणने कार्यवाही केली़ परभणी जिल्ह्यात विजेची चोरी न करता वीज वापर करावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही महावितरणने दिला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीmahavitaranमहावितरणtheftचोरी