बांधकाम सभापतीपदी शामराव मते यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:16 IST2021-01-21T04:16:48+5:302021-01-21T04:16:48+5:30
जिंतूर : येथील नगरपालिकेतील विषय समित्यांच्या निवडी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडल्या. यामध्ये बांधकाम ...

बांधकाम सभापतीपदी शामराव मते यांची निवड
जिंतूर : येथील नगरपालिकेतील विषय समित्यांच्या निवडी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडल्या. यामध्ये बांधकाम सभापतीपदी सलग तिसऱ्यांदा शामराव मते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाणीपुरवठा सभापतीपदी शाहेद बेग मिर्झा यांची तर महिला व बालकल्याण समितीवर अर्चना काळे तसेच स्थायी समिती सदस्यपदी आशा अंभोरे व फरजाना बेगम अहमद यांची निवड करण्यात आली. आमदार विजय भांबळे, नगराध्यक्षा सबिया बेगम फारोखी, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षा प्रेक्षताई भांबळे, उपाध्यक्ष बाळासाहेब भांबळे, मुख्याधिकारी आसाराम लोमटे, समाजकल्याण सभापती रामराम उबाळे, कफिल फारोखी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मनोज थिटे, उस्मान पठाण, दलमीर पठाण, शोहेब जनिमिया, इस्माईल शेख, मनोहर डोईफोडे, चंद्रा बहिरट, बंटी निकाळजे, लखुजी जाधव यांनी नवनिर्वाचित सभापतींचे अभिनंदन केले.