शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोचालकाच्या खुनातील आरोपी शोधासाठी आठ पथके; नानलपेठ पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा

By राजन मगरुळकर | Updated: February 15, 2026 14:47 IST

- राजन मंगरुळकर परभणी : शहरातील नांदखेडा रोड भागात शनिवारी दुपारी झालेल्या ऑटो चालकाच्या खून प्रकरणात पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह ...

- राजन मंगरुळकर

परभणी : शहरातील नांदखेडा रोड भागात शनिवारी दुपारी झालेल्या ऑटो चालकाच्या खून प्रकरणात पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आरोपीच्या शोधासाठी आठ पथकांची स्थापना केली आहे. रविवारी या पथकांकडून आरोपीचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होती. यासाठी शनिवारी सायंकाळपासून या घटनेत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीच्या शोधाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी मयताचा भाऊ सय्यद आसेफ सय्यद गफूर (रा.पाकीजा मोहल्ला, जुनी जिल्हा परिषद समोर) यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये मयत सय्यद अकबर उर्फ बब्बू सय्यद गफूर हा त्याचा ऑटो क्रमांक (एमएच २२ एपी १८५२) नांदखेडा रोडने सोमनाथ नगर कमानीच्या आतमध्ये मयत आढळून आला. त्याचा अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी चाकूने गळा चिरून खून केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक खजे करीत आहेत.

एलसीबीची चार, नानलपेठची चार पथके

पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी या प्रकरणात दोन स्वतंत्र पथके तयार केली. स्थानिक गुन्हा शाखेची चार पथके पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात तर नानलपेठची चार पथके पोलिस निरीक्षक गणेश कदम यांच्या मार्गदर्शनात तयार केली आहेत. यामध्ये सायबर तज्ञांसह गुन्हेगाराच्या शोधासाठी ८ अधिकारी, ३२ कर्मचाऱ्यांकडून तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Eight teams search for auto driver's killer; case filed.

Web Summary : Police formed eight teams to find the killer of an auto driver in Parbhani. An unknown person is booked for murder. Investigation underway using CCTV footage.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी