शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ग्रामस्थांचा आत्महत्येचा प्रयत्न, तहसिलदाराच्या दालनातच केले विषारी द्रव्य प्राशन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 12:35 IST

मानवत तालुक्यातील मानोली येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून चार ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात विषारी द्रव्य प्राशन करून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देमानवत तालुक्यातील मानोली येथील १५ ग्रामस्थांनी १० एप्रिल रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला होता़

परभणी : मानवत तालुक्यातील मानोली येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून चार ग्रामस्थांनी तहसीलदारांच्या दालनात विषारी द्रव्य प्राशन करून सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी १०.४५ च्या सुमारास ही घटना घडली. यातील दोघा ग्रामस्थांची प्रकृती अस्वस्थ असून, त्यांना  परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, मानवत तालुक्यातील मानोली येथील १५ ग्रामस्थांनी १० एप्रिल रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला होता़ मानोली गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, २२ बोगस बंधाऱ्यांची चौकशी करावी आणि गावातील इतर गैरव्यवहारांची चौकशी करावी, अशा ग्रामस्थांच्या  प्रमुख मागण्या होत्या़ या मागण्या न सोडविल्यास १९ एप्रिल रोजी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.

आज सकाळी १०़३० वाजण्याच्या सुमारास हे ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाले़ पोलीस प्रशासनाने या ग्रामस्थांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला़ दरम्यान, पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये झटापट झाली़ या झटपटीतच लक्ष्मण शिंदे, चंद्रकांत तळेकर, दत्ता कदम, शेख सगीर या चार ग्रामस्थांनी सोबत आणलेले विष प्राशन केले़ त्यानंतर एकच गोंधळ उडाला़ तातडीने या चारही ग्रामस्थांना मानवतच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. चारही ग्रामस्थांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे़ दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे़ 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या