दुधना प्रकल्पाचे पाणी आज नदीपात्रात

By Admin | Updated: December 1, 2014 14:54 IST2014-12-01T14:54:30+5:302014-12-01T14:54:30+5:30

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातील पाणी सोमवारी नदीपात्रात सोडणार असल्याची माहिती आ. विजय भांबळे यांनी रविवारी भ्रमणध्वनीवरुन दिली.

Dudhna project water in the river bank today | दुधना प्रकल्पाचे पाणी आज नदीपात्रात

दुधना प्रकल्पाचे पाणी आज नदीपात्रात

सेलू : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातील पाणी सोमवारी नदीपात्रात सोडणार असल्याची माहिती आ. विजय भांबळे यांनी रविवारी भ्रमणध्वनीवरुन दिली. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्याशी याबाबत दोन वेळा चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी हे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी अत्यल्प पावसामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुधना काठावरील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. निम्न दुधना प्रकल्पातून रबी हंगामासाठी उजव्या व डाव्या कालाव्यात पाणी सोडले. मात्र दुधना नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडेठाक पडल्यामुळे नदीकाठावरील गावांत पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे दुधना नदीपात्रात प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी होत होती. 
आ.विजय भांबळे यांनी परभणी व औरंगाबाद येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीतही हा प्रश्न उपस्थित करुन जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्याशी चर्चाही केली होती. त्यानंतर निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी रविवारी संबंधित विभागाला दिले. सोमवारी सकाळी ९ वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे ४८ तास उघडे ठेवून ६00 क्युसेस वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. (वार्ताहर)

-------------

४0 गावांना मिळणार दिलासा

४/पावसाचे पाणी निम्न दुधना प्रकल्पात अडविण्यात आले. यामुळे प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला. परंतु, दुधना नदी दुथडी भरुन वाहिली नाही. त्यामुळे नदीकाठावरील गावांना पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पाणीपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाई निर्माण होऊ लागली. त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्याचा आग्रह ग्रामपंचायतींनी केला होता. सोमवारी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने सेलू, मानवत व परभणी तालुक्यातील नदीकाठावरील ४0गावांचा पाणी व चार्‍याचा प्रश्न काहीअंशी मिटणार आहे.

Web Title: Dudhna project water in the river bank today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.