शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भर उन्हाळ्यात दुधनाचे पात्र भरले; पूर्णा नदीचाही वाढला प्रवाह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 15:37 IST

जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे.

ठळक मुद्देपरभणी व पूर्णा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.ने निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीच्या माध्यमातून या शहरांना पाणी दिले जात आहे.

परभणी : जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे. हे पाणी दुधनातून पूर्णा नदीत प्रवाही झाले आहे.

परभणी व पूर्णा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या दोन्ही शहरांना पूर्वी येलदरी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, गेल्या वर्षी येलदरी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला नसल्याने निम्न दुधना प्रकल्पातून दुधना नदीच्या माध्यमातून या शहरांना पाणी दिले जात आहे. या अनुषंगाने १ एप्रिल रोजी निम्न दुधना प्रकल्पातून या दोन्ही शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ८ दलघमी पाणी १२०० क्युसेसने दुधना नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत दुधना नदीचे पात्र तुडूंब भरुन वाहू लागले आहे.

हे पाणी दुधना नदीतून पूर्णा नदीत प्रवाही झाले असून ते परभणी- वसमत रस्त्यावरील राहटी येथील बंधाऱ्यातही दोन दिवसांपूर्वीच पोहचले. तेथून ते पूर्णा शहराजवळ असलेल्या  बंधाऱ्यातही पोहचले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दुधना बरोबरच पूर्णा नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने या नदीकाठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सध्या तरी सुटला आहे. शिवाय वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय झाली आहे. नदीपात्रामध्ये केवळ पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले असल्याने या पाण्याचा व्यावसायिक वापर केला जावू नये, याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरणparabhaniपरभणीriverनदीPurna Riverपूर्णा नदी