शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाडावर धडकून चालक ठार; चार मजूर गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:20 IST

भीषण अपघातात कॅबीनचा भाग कटरच्या सहाय्याने कापावा लागला

जिंतूर (परभणी ):  सावळी येथून लाकडे घेऊन जिंतूरकडे परतणारा टेम्पो झाडावर धडकल्याने चालक जागीच ठार झाला. आज दुपारी (दि. २० ) झालेल्या या अपघातात चार मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर परभणी येथे उपचार सुरु आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर येथून तालुक्यातील सावळी येथे एक टेम्पो ( क्रमांक एम एच 04 सी जि 0528 ) आज सकाळी लाकडे आणण्यासाठी गेला होता. दुपारी लाकडे घेऊन परत जिंतुरकडे येत असताना शेवडी शिवारामध्ये चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला धडकला. यात चालक सय्यद अफरोज सय्यद तय्यब व शेख शोएब शेख उस्मान, मेहताब खा रशीद खान हे दोन मजूर कॅबीनमध्ये अडकले. गॅस कटरच्या मदतीने टेम्पोचा काही भाग कापून बाहेर काढून त्यांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु चालक सय्यद अफरोज सय्यद तय्यब यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. 

यासोबतच टेम्पोच्या जाळीत बसलेले शेख रियाज शेख मुख्तार, शेख सलमान शेख उस्मान हे रस्त्यावर फेकल्या गेल्याने गंभीर झाले आहेत.  चारही जखमींवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारांसाठी जखमींना परभणी येथे पाठविण्यात आले आहे. 

नागरिकांच्या मदतीने वाचले प्राण अपघाताची माहिती मिळताच शेवडी व शहरातील काही नागरिकांनी मदतकार्यासाठी तत्काळ धाव घेतली. प्रसंगावधान राखत नागरिकांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने टेम्पो बाहेर काढला व गॅस कटरच्या सहाय्याने काही कॅबिनचा भाग कापून चालक व दोन मजुरांना बाहेर काढले. कॅबिनमधील गंभीर जखमींना वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्गparabhaniपरभणी