ऑटोस नकार दिल्याने चालकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:30+5:302021-05-28T04:14:30+5:30
जांब येथील वैजनाथ देवीदास रेंगे हे ऑटो चालवतात. २५ मे रोजी पहाटे ३ वाजता गावातील मुंजा रावसाहेब रेंगे याने ...

ऑटोस नकार दिल्याने चालकास मारहाण
जांब येथील वैजनाथ देवीदास रेंगे हे ऑटो चालवतात. २५ मे रोजी पहाटे ३ वाजता गावातील मुंजा रावसाहेब रेंगे याने त्यांना तुझा ऑटो घेऊन परभणीला जाऊ, असे सांगितले. त्या वेळी वैजनाथ रेंगे यांनी नकार दिला. त्यानंतर दुपारी २.३० च्या सुमारास मुंजा रेंगे याने वैजनाथ यांना तू सकाळी ऑटो का काढला नाहीस? असे म्हणत शिवीगाळ करून त्यांच्या डोक्यात दगड मारला. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय जीवे मारण्याची धमकी दिली. या वेळी इतरांनी सोडवासोडव केली. मार लागल्याने वैजनाथ रेंगे यांनी परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतला. त्यानंतर २७ मे रोजी त्यांनी दैठणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी मुंजा रेंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.