ताडकळस येथे दारू पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:42 IST2017-11-24T23:41:50+5:302017-11-24T23:42:01+5:30
दुचाकीवरून अवैधरित्या विक्रीसाठी दारू नेली जात असताना पोलिसांनी छापा टाकून ९६ बाटल्या व दुचाकी जप्त केली. ही कारवाई ताडकळस येथे २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.

ताडकळस येथे दारू पकडली
लोकमत न्यूज नेटवर्क
ताडकळस : दुचाकीवरून अवैधरित्या विक्रीसाठी दारू नेली जात असताना पोलिसांनी छापा टाकून ९६ बाटल्या व दुचाकी जप्त केली. ही कारवाई ताडकळस येथे २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
एका दुचाकीवरून देशी दारूच्या बाटल्या नेल्या जात असल्याची माहिती ताडकळस पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ताडकळस शिवारात एका दुचाकीला थांबवून तपासणी केली असता दुचाकी चालकाकडे देशी दारूच्या ९६ बाटल्या आढळून आल्या.
दारुच्या बाटल्या व दुचाकी जप्त करुन ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.