डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ठिकठिकाणी अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:35+5:302021-04-15T04:16:35+5:30
रविराज पार्क येथे कार्यक्रम येथील रविराज पार्क येथे फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ठिकठिकाणी अभिवादन
रविराज पार्क येथे कार्यक्रम
येथील रविराज पार्क येथे फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी धम्म ध्वजारोहण करण्यात आले. बौद्धाचार्य डी. आय. खेडकर यांनी बुद्धवंदना घेतली. सामूहिक वंदनेनंतर संविधानाच्या सरनाम्याचे नियमित सामूहिक वाचन करण्यात येते. गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे यांनी सरनाम्याचे वाचन करुन संविधानकारांना अभिवादन केले. कार्यक्रमास जयंती समितीचे अध्यक्ष पंकज खेडकर, उपाध्यक्ष आर.एन. मस्के, डॉ. आनंद मनवर, बी. आर. आव्हाड, सॅण्डीरणवीर, नागसेन आटकोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी दशरथ भालेराव यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दशरथ भालेराव यांच्या निधनाने संपूर्ण वसाहतीत दु:खाचे सावट आहे. त्यामुळे १३ एप्रिल रोजी रात्री आतषबाजी न करण्याचा निर्णय जयंती समितीने घेतला होता. मात्र भालेराव कुटुंबीयांनी दु:ख घरात ठेवून नियोजित आतषबाजी करुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची विनंती जयंती मंडळला केली. त्यामुळे जड अंतकरणाने ही विनंती मान्य करीत रात्री १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भीमप्रकाश गायकवाड यांनी सुरेंद्र भालेराव यांच्या निष्ठा बद्दल अभिनंदनाचा ठराव घेतला. त्यास एकमुखी मान्यता देण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा
येथील भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात जयंती कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी ८ वाजता तथगात भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब धबाले यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. पू.भंते कश्यप यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मराठवाडा प्रमुख ए.एच. भेरजे, अशोक कांबळे, डी.के. टोम्पे, एन.जी. गोधम यांनी मानवंदना दिली. यावेळी इंजिनिअर एम.एम. भरणे, व्ही.व्ही. वाघमारे, एस.एम. कांबळे, पी.एल. वानखेडे, बंडू कांबळे, थोरात आदींची उपस्थिती होती.