कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST2021-07-26T04:17:32+5:302021-07-26T04:17:32+5:30
सध्या प्रत्येकाच्या हाती अँन्ड्राँईड मोबाईल आला आहे. यातच अनेक बँकांचे अँप्लिकेशन तसेच मोबाइल बँकींग यासह पैसे पाठविणे व ...

कमी टक्क्यात कर्जाचा मेसेज आला म्हणून ॲप डाऊनलोड करू नका
सध्या प्रत्येकाच्या हाती अँन्ड्राँईड मोबाईल आला आहे. यातच अनेक बँकांचे अँप्लिकेशन तसेच मोबाइल बँकींग यासह पैसे पाठविणे व मागविणे ही कामे आता जागेवरुनच होत आहेत. यासाठी पुर्वीप्रमाणे बँकेत जाण्याची गरज नाही. तर कोरोनाकाळात आणि त्याआधी पासून काही खासगी कंपन्यांनी मोबाईल अँप्लिकेशन बनवून त्या माध्यमातून छोट्या रकमेचे कर्ज वाटप केवळ ठराविक कागदपत्रे मोबाईलमधून सादर केल्यानंतर देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये ७ दिवस, १५ दिवस, १ महिना या कालावधीसाठी १ हजार ते २० हजारपर्यंतची रक्कम आलेल्या एका लिंकवर क्लिक केल्यावर देण्याचे आमिष दाखविले जात आहे. यात अनेकांची फसवणूक झाली आहे. किरकोळ वाटणाऱ्या या रक्कमेसाठी अव्वाच्या सव्वा व्याजदर लावून रक्कम दिली जाते तसेच परतही घेतली जाते. यामुळे कोणत्याही लिंकला सर्च करुन त्याच्याच माहिती भरणे महागात पडू शकते. असे न केल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.