जिल्ह्याला मिळाले ८ हजार डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:22 IST2021-04-30T04:22:12+5:302021-04-30T04:22:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : कोविशिल्ड लसीचे ८ हजार डोस जिल्ह्याला गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्राप्त झाले असून, ...

The district received 8,000 doses | जिल्ह्याला मिळाले ८ हजार डोस

जिल्ह्याला मिळाले ८ हजार डोस

लोकमत न्यूज नेटवर्क

परभणी : कोविशिल्ड लसीचे ८ हजार डोस जिल्ह्याला गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्राप्त झाले असून, शुक्रवारपासून पुन्हा लसीकरण केंद्र सुरू होणार आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असतानाच लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. बुधवारी लसीअभावी जिल्ह्यातील ९४ केंद्र बंद ठेवावी लागली होती. काही केंद्रांवर थोड्याफार प्रमाणात लस शिल्लक होती. त्यातून गुरुवारी ४ हजार ९२१ नागरिकांना लसीकरण करण्यात आले; परंतु सायंकाळपर्यंत जिल्हाभरात लसीचा साठाच उपलब्ध नसल्याने शुक्रवारी केंद्र बंद ठेवावी लागतात की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, गुरुवारी सायंकाळी कोविशिल्डचे ८ हजार डोस जिल्ह्याला प्राप्त झाल्यामुळे शुक्रवारपासून बहुतांश केंद्रांवर लसीकरण सुरू होईल.

१ लाख ५७ हजार नागरिकांचे लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५७ हजार १४० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आता जिल्ह्याला पुन्हा ८ हजार डोस मिळाले असून, शुक्रवारपासून जास्तीत जास्त केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे.

शहरासाठी १९०० डोस

जिल्ह्याला मिळालेल्या ८ हजार डोसपैकी जिल्हा रुग्णालय आणि महानगरपालिकेसाठी १ हजार ९०० डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामीण रुग्णालयासाठी २०० व छोट्या केंद्रांसाठी १०० डोसचे वितरण करण्यात आले.

असे झाले आतापर्यंतचे लसीकरण

आरोग्य कर्मचारी : १३७५९

कोरोना योद्धे : २२४१२

पंचेचाळीस वर्षांपुढील नागरिक : १,२०,९२५

Web Title: The district received 8,000 doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.