५१ आरोग्य उपकेंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:38+5:302021-07-18T04:13:38+5:30
कोरोनाच्या रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेऊन पीएम केअर योजनेतून जिल्ह्यासाठी ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्राप्त झाल्या आहेत. येथील ...

५१ आरोग्य उपकेंद्रांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप
कोरोनाच्या रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची आवश्यकता लक्षात घेऊन पीएम केअर योजनेतून जिल्ह्यासाठी ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्राप्त झाल्या आहेत. येथील जिल्हा परिषदेतील सभागृहात १६ जुलै रोजी जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, गोविंद देशमुख, दिनेश बोबडे आदींची उपस्थिती होती. बैठकीत प्राथमिक स्वरूपात आरोग्य उपकेंद्रांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना टाकसाळे म्हणाले, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता ग्रामीण भागात आरोग्य अधिकाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आरटीपीसीआरची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.