यासंदर्भात द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. याच अनुषंगाने परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननेही राज्य व केंद्र शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. कोरोना संसर्ग काळात औषध विक्रेत्यांचा संपर्क बाधित रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी येतो. त्यातून अनेक औषध विक्रेते कोरोनाबाधित बनले आहेत. स्वतःचाजीव धोक्यात घालून औषध विक्रेते कोरोनासारख्या संकटकाळात रुग्णांना सेवा देत आहेत; परंतु या औषध विक्रेत्यांना कोरोना योद्धा म्हणून समाविष्ट करून घेतले नाही. त्याचप्रमाणे लसीकरणासारख्या मोहिमेतही प्राधान्य दिले गेले नाही. त्यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासंदर्भात शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास औषध विक्री व्यवसाय बंद ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र कॉमर्स अँड ड्रगिस्ट असोसिएशनसह जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके यांनी दिला आहे.
केंद्र, राज्य सरकारच्या धोरणावर औषध विक्रेत्यांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:17 IST