वीज बिल भरूनही पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:11 IST2021-02-22T04:11:57+5:302021-02-22T04:11:57+5:30
बोरी: जिंतूर तालुक्यातील कौसडी व नागठाणा येथील शेतकऱ्यांनी वीज बिल भरूनही बोरी येथील फिडर बंद केल्याने या ठिकाणचा वीज ...

वीज बिल भरूनही पुरवठा खंडित
बोरी: जिंतूर तालुक्यातील कौसडी व नागठाणा येथील शेतकऱ्यांनी वीज बिल भरूनही बोरी येथील फिडर बंद केल्याने या ठिकाणचा वीज पुरवठा मागील तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे वीज बिल भरूनही वीज पुरवठा खंडितच असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला होत आहे. बोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून कौसडी, बोरी, दुधगाव, मुडा, वर्णा, निवळी, नागठाणा, वाघी बोबडे आदी २० गावांना वीज पुरवठाण करण्यात येतो. या गावांमध्ये मागील अनेक वर्षांपासून काही वीज ग्राहकांनी वीज बिल न भरल्याने थकबाकीचा आकडा वाढला आहे.त्यामुळे हे थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने मागील आठ दिवसांपासून विशेष वीज बिल वसुली मोहीम राबविली जातआहे. या मोहीमेंतर्गत जिंतूर तालुक्यातील नागठाणा व कौसडी शिवारातील काही शेतकऱ्यांनी आपले वीज बिल भरले आहे. मात्र वीज वितरण कंपनीने या गावांना वीज पुरवठा होणाऱ्या कौसडी येथील फिडरचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे वीज बिल भरूनही मागील तीन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असलयाने अडचणींचा सामना करावा लागत आहे.