आपत्तीग्रस्तांना दोन दिवसात मदत जाहीर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:13 IST2021-07-18T04:13:46+5:302021-07-18T04:13:46+5:30
परभणी जिल्ह्यात ११ व १२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परभणी शहरात तर अनेक ...

आपत्तीग्रस्तांना दोन दिवसात मदत जाहीर करणार
परभणी जिल्ह्यात ११ व १२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परभणी शहरात तर अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याने मोठे नुकसान झाले, तसेच हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले. शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेली. त्यामुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे मराठवाडा समन्वयक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली होती. त्यावेळी वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता. या अनुषंगाने हत्तीअंबिरे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेतली. त्यांना जिल्ह्यात झालेल्या नुकसानाची माहिती दिली. यावेळी मुगळीकर यांनी दोन दिवसांत नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून मदत जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे हत्तीअंबिरे म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची उपस्थिती होती.