शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्यात निराशा, आता फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत नुकसान भरून निघण्याची आशा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 12:41 IST

शेतकऱ्यांची सारी आशा दिवाळी सणावर आहे. 

- प्रशांत मुळीयेलदरी वसाहत : पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण परिसरातील आंबरवाडी शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर परवडणारी फुल शेती निवडली आहे.सुरुवातीची तोडणी साधारणपणे दसऱ्याच्या मुहूर्तावर केली जाते. परंतु यावर्षी दसऱ्यात झेंडूस कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच निराशा झाली. यामुळेच आता शेतकऱ्यांची सारी आशा दिवाळी सणावर आहे. 

यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे रब्बीची आशा मोठ्या प्रमाणात धूसर होत चालली आहे. असे असताना यंदा मोठ्या प्रमाणात झेंडू फुल शेतीचा मार्ग शेतकऱ्यांनी निवडला आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी या अनुषंगाने फुल उत्पादकांनी झेंडू लावला. दररोज झेंडूच्या विक्री मध्ये शेतकऱ्यांना २० ते ३० रुपये प्रतिकिलोपर्यंतचे दर दसऱ्यापर्यंत मिळाले. शेतकऱ्यांनी दसऱ्यानिमित्त झेंडू फुले मुंबई,हैद्राबाद,पुणे, छत्रपती संभाजीनगर आदी मोठ्या शहरांमध्ये विक्रीस नेली होती. आदल्या दिवशी ३० ते ४० रुपये प्रति किलोने विकला गेलेला झेंडू दसऱ्याच्या दिवशी मात्र पाच ते दहा रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली घसरला. यामुळे अनेकांनी फुलाचा ढीग तसाच सोडलयाने दसरा त्यांच्यासाठी नुकसानीचा ठरला. आता सगळ्यात मोठा सण दिवाळी आला आहे. या सणासाठी शेतकऱ्यांनी फुले तोडणी करून मराठवाड्यासह राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक या शहरांकडे पाठवला आहे. शेतकऱ्यांनी फुल शेतीसाठी खूप मेहनत घेतली असून चार वेळा कीडनाशक फवारणी केली आहे. त्यात पुन्हा वन्यप्राणी उपद्रव करत असल्याने शेतकरी दिवसरात्र शेतातच होता. तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे अधिकची मजुरी देऊन फुल तोडणी करावी लागली आहे. यामुळे दिवाळीला तरी लक्ष्मी पावेल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे. 

नुकसान भरून निघावेझेंडू फुलांना सध्या ३० ते ४० रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे. दीपावलीच्या मुहूर्तावर यात १० ते २० रुपये वाढ झाल्यास मागील नुकसान भरून काढण्यासाठी मदत होईल. - अर्जुन घुगे, फूल शेतकरी, आंबरवाडी

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादAgriculture Sectorशेती क्षेत्र