रिमझिम पावसात दिंडीचे स्वागत

By Admin | Updated: June 20, 2014 00:22 IST2014-06-20T00:22:48+5:302014-06-20T00:22:48+5:30

परभणी: मागील १५ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा सुरु असून आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरात रिमझिम पाऊस झाला.

Dildos welcome in the rainy season | रिमझिम पावसात दिंडीचे स्वागत

रिमझिम पावसात दिंडीचे स्वागत

परभणी: मागील १५ दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा सुरु असून आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरात रिमझिम पाऊस झाला. श्री गजानन महाराजांची पालखी शहरात आली असताना तिच्या स्वागतासाठी हा पाऊस झाला, अशी नागरिकांची भावना बनली आहे.
दहा ते १५ मिनिटे शहरामध्ये पावसाची रिमझिम सुरु होती. या पावसामुळे मात्र सायंकाळी दमट वातावरण निर्माण झाले होते. उकाडा प्रचंड जाणवत होता. मृग नक्षत्र सुरु झाले तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे नागरिकांत अस्वस्थता निर्माण झालेली आहे. दरम्यान, श्रीक्षेत्र शेगाव येथील गजानन महाराज यांच्या पालखीची दिंडी प्रती वर्षाप्रमाणे पंढरपूरला जात असताना तिचा परभणीत एक दिवस मुक्काम होता. वसमत रोड, नवा मोंढा व शहरातील अन्य ठिकाणी दिंडीचे स्वागत करण्यात आले. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री नवा मोंढा येथील रोकड हनुमान मंदिरात मोठा कार्यक्रम झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Dildos welcome in the rainy season