केबल वायर तुटल्याने दस्त नोंदणीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST2020-12-26T04:13:52+5:302020-12-26T04:13:52+5:30
पालम : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात २४ डिसेंबर रोजी परभणी येथून इंटरनेट सेवा पुरविणारे केबल वायर तुटल्याने दस्त नोंदणीचा ...

केबल वायर तुटल्याने दस्त नोंदणीचा खोळंबा
पालम : येथील दुय्यम निबंधक कार्यालयात २४ डिसेंबर रोजी परभणी येथून इंटरनेट सेवा पुरविणारे केबल वायर तुटल्याने दस्त नोंदणीचा खोळंबा झाला आहे. नोंदणीसाठी आलेल्या पक्षकारांनी प्रतीक्षा करीत दिवसभर ठाण मांडले होते.
पालम येथील प्रशासकीय इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर दुय्यम निबंधक कार्यालय आहे. या कार्यालयात तालुक्यातील शेती व इतर मालमत्ता खरेदी व विक्रीचे व्यवहार होतात. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. यासाठी परभणी येथून केबल वायर अंथरण्यात आलेली आहे. गंगाखेड ते परभणीदरम्यान रस्ता दुरुस्ती काम करताना हे केबल वायर तुटल्याने इंटरनेट सेवा बंद झाली आहे. त्यामुळे दिवसभर नेटवर्कची समस्या निर्माण झाली होती. रजिस्ट्रीकरिता आलेले पक्षकार ताटकळत बसले होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सेवा सुरळीत चालू झाली नाही. त्यामुळे व्यवहार ठप्प पडले आहेत.