मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:32 IST2020-12-16T04:32:57+5:302020-12-16T04:32:57+5:30

एसईबीसी प्रवर्गातून शासकीय सेवेत अनेक उमेदवारांची निवड झाली आहे. असे असताना राज्य शासनाकडून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. नियुक्तीपत्राच्या ...

Dharne Andolan of Maratha Kranti Morcha | मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन

मराठा क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन

एसईबीसी प्रवर्गातून शासकीय सेवेत अनेक उमेदवारांची निवड झाली आहे. असे असताना राज्य शासनाकडून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. नियुक्तीपत्राच्या मागणीसाठी मुंबई येथे या उमेदवारांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे सुभाषदादा जावळे, सोपान शिंदे, किशोर रणेर, बाबासाहेब बचाटे, विजय जाधव, विठ्ठल तळेकर, राजेश ताटे, दिलीप माने, सतीश जाधव, सुनील रणेर, लक्ष्मण मोहिते, आकाश शिंदे, सतीश डुकरे, अमोल अवकाळे, रामा सुकरे, गौरव देशमुख, यशवंत सोळंके, राजेश शिंदे, किशोर शिंदे यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Dharne Andolan of Maratha Kranti Morcha