रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:16 IST2021-04-17T04:16:36+5:302021-04-17T04:16:36+5:30
या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार ज्या रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून आरोग्य विभागाकडून परवानगी ...

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार थांबविण्याची मागणी
या संदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार ज्या रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून आरोग्य विभागाकडून परवानगी देण्यात आलेली आहे, त्याच रुग्णालयातील कोविड रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार आहे, परंतु जिल्ह्यात जवळपास ८ ते १० खासगी रुग्णालयांनी जिल्हा प्रशासनानी कोविड रुग्णालय म्हणून मान्यता घेतलेली नाही. मान्यतेसाठी संबंधितांना शासन नियमांचे पालन करावे लागते. यातून पळवाट काढत मनमानी केली जात आहे. ही रुग्णालये रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शनची व्यवस्था करण्यास सांगत आहेत. इथूनच या इंजेक्शनच्या काळ्या बाजारास सुरुवात होत आहे. परिणामी, रुग्णांचे नातेवाईक अव्वाच्या सव्वा दराने हे इंजेक्शन खरेदी करतात. त्यामुळे ज्या रुग्णालयामध्ये कोविड रुग्ण आहेत, परंतु त्यांनी प्रशासनाची मान्यता घेतलेली नाही, त्यांच्यावर कारावी व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवावा, असेही या निवेदनात बोधणे यांनी म्हटले आहे. निवेदनावर गजानन चोपडे, पिंटू कदम, ज्ञानेश्वर पंढरकर आदींची नावे आहेत.