रमजानच्या खरेदीसाठी दुकाने सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:18 IST2021-05-07T04:18:10+5:302021-05-07T04:18:10+5:30

सध्या मुस्लीम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या महिन्यातील दोन आठवडे संपले असून, अखेरच्या आठवड्यात १४ मे ...

Demand to start shops for Ramadan shopping | रमजानच्या खरेदीसाठी दुकाने सुरू करण्याची मागणी

रमजानच्या खरेदीसाठी दुकाने सुरू करण्याची मागणी

सध्या मुस्लीम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. या महिन्यातील दोन आठवडे संपले असून, अखेरच्या आठवड्यात १४ मे रोजी रमजान ईद आहे. ईदनिमित्त मुस्लीम बांधवांना जीवनावश्यक वस्तू तसेच इतर साहित्याची खरेदी करावयाची असते. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यातील बाजारपेठ बंद असल्याने खरेदीची मोठी अडचण झाली आहे. शिवाय रमजान काळात लघु व्यावसायिकांचा व्यवसायही ठप्प होऊन या व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेता, रमजान महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जीवनावश्यक वस्तू व इतर दुकाने नियम व अटी लावून सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर, सचिव महबूब खान पठाण, शेख उस्मान शेख इस्माईल, शेख गनी शेख रहेमान आदींनी केली आहे.

Web Title: Demand to start shops for Ramadan shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.