हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:17 IST2020-12-31T04:17:46+5:302020-12-31T04:17:46+5:30

तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम मानवत : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून तहसील कार्यालयाचा परिसर ...

Demand to start guarantee center | हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी

हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी

तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम

मानवत : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून तहसील कार्यालयाचा परिसर स्वच्छ केला. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक ओम चव्हाण, सुभाष लांडगे, दीपक भदर्गे, सुनील कीर्तने यांच्यासह पालिकेतील स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

शनी मंदिर येथे दत्त जयंती उत्साहात

सोनपेठः येथील शनी मंदिरात नूतन गुरुवार भजनी मंडळाच्या वतीने २९ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मानिमित्त श्री दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ९:३० वाजता गुरू पंचपदीला सुरुवात केली. दुपारी १२:०१ वाजता श्री दत्त जन्म व सामूहिक आरती करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मोजक्याच दत्त भक्तांचा समावेश होता. याप्रसंगी माजी आ. व्यंकटराव कदम, बालमुकुंद सारडा, मुक्तेश्वर अंबुरे, महेश शर्मा, रामनिवास सारडा, गोपाळराव नाइक, राधाकिशन सोलापूरकर, सत्यनारायण शर्मा, सचिन देशपांडे मुक्ताराम दळवे, सुनील बर्वे, वैद्यनाथ चौडे, राजू जाधव, ज्ञानेश्वर गर्जे, सत्यप्रेम सातभाई, विष्णु डंमढरे, रामप्रसाद सारडा, राधेशाम वर्मा, मुकेश बाहेती, रमेश झंवर, शिवमल्हार वाघे याच्यासह शनिवार भजनी मंडळ व नुतन गुरुवार भजनी मंडळाचे सदस्य श्री दत्त भक्त, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Demand to start guarantee center