कोरोना योद्ध्यांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:18 IST2021-04-23T04:18:42+5:302021-04-23T04:18:42+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनातील आरोग्य, पोलीस, नगरपालिका, महसूल व इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी कोविड योद्धे ...

कोरोना योद्ध्यांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्याची मागणी
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनातील आरोग्य, पोलीस, नगरपालिका, महसूल व इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी कोविड योद्धे म्हणून काम करतात. अधिकारी - कर्मचारी जीवावर उदार होऊन कर्तव्य बजावत असताना ते कोरोनाबाधित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, या रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तेव्हा कोरोना योद्ध्यांसाठी शासकीय अथवा खासगी रुग्णालयात १० टक्के खाटा प्राधान्याने राखीव ठेवाव्यात, अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेने केली आहे. विशेष म्हणजे, हे बेड रिक्त नसले तरी चालतील; परंतु कोविड योद्धा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रिकामा होणारा बेड प्राधान्याने कोरोना योद्धा व त्याच्या कुटुंबातील व्यक्तिंना उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर आणि जिल्हा सरचिटणीस विजय मोरे यांनी केली आहे.