२४ तास चौकी सुरू ठेवण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST2020-12-06T04:18:14+5:302020-12-06T04:18:14+5:30
महामंडळानेच निधी द्यावा परभणी : वेगवेगळ्या आर्थिक विकास महामंडळांतर्गत बेरोजगारासाठी योजना राबविल्या जातात. या योजनांतर्गत लाभार्थ्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ...

२४ तास चौकी सुरू ठेवण्याची मागणी
महामंडळानेच निधी द्यावा
परभणी : वेगवेगळ्या आर्थिक विकास महामंडळांतर्गत बेरोजगारासाठी योजना राबविल्या जातात. या योजनांतर्गत लाभार्थ्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर बँकांकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विकास महामंडळ आदी महामंडळांचे हजारो प्रस्ताव बँकांकडे पडून आहेत. या प्रस्तावांवर कार्यवाही होत नसल्याने महामंडळानेच निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
बसस्थानकात धूळ
परभणी : शहरातील नवीन बसस्थानक परिसरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवाशांसह चालक, वाहक त्रस्त झाले आहेत. नवीन तात्पुरते बसस्थानक उभारताना कोणतीही दक्षता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
खड्डा बनला धोकादायक
परभणी : जिंतूर-परभणी या रस्त्यावर धर्मापुरी गावापर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हा महामार्ग असल्याने रात्री-अपरात्री भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनधारकांच्या लक्षात हे खड्डे येत नाहीत. त्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. येथे महामार्ग प्राधिकरणाने कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे वाढते अपघात टाळण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.