मागणी १७ हजार कुटुंबांचे ; उद्दिष्ट दिले फक्त ४८२ घरकुलांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:14 IST2020-12-23T04:14:19+5:302020-12-23T04:14:19+5:30
घरकूल बांधकामासाठी वाळूचा अडसर पाथरी तालुक्यात मंजूर असलेल्या घरकुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. घरकुल बांधकामासाठी मागील काही वर्षात वाळूचा ...

मागणी १७ हजार कुटुंबांचे ; उद्दिष्ट दिले फक्त ४८२ घरकुलांचे
घरकूल बांधकामासाठी वाळूचा अडसर
पाथरी तालुक्यात मंजूर असलेल्या घरकुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. घरकुल बांधकामासाठी मागील काही वर्षात वाळूचा मोठा अडसर येत आहे. शासनाने घरकुलसाठी ४२० रुपये प्रति ब्रास दराने वाळू उपलब्ध करून देण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात मागणी येऊनही या यंत्रणेकडून त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. त्यामुळे लाभार्थ्यामधून संताप व्यक्त केला जात आहे.
प्रधानमंत्री आवास ग्रामीण घरकुल योजना
वर्ष : उद्दिष्ट : घरकुल पूर्ण
२०१६-१७--२२४ ( २१३ पूर्ण)
२०१७-१८-८१ ( ५९ पूर्ण )
२०१८-१९ --१३ (११ पूर्ण )
२०१९-२०- ५४ ( १० पूर्ण )
२०२०-२१ -११० --अद्याप मंजुरी नाही