फेसबुकवर बदनामी; परभणीत चौघांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:59 IST2017-11-25T23:59:11+5:302017-11-25T23:59:17+5:30
येथील एका २० वर्षीय महिलेची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी नांदेड येथील चौघांजणाविरूद्ध न्यायालयाच्या आदेशावरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़

फेसबुकवर बदनामी; परभणीत चौघांविरूद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा :येथील एका २० वर्षीय महिलेची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी नांदेड येथील चौघांजणाविरूद्ध न्यायालयाच्या आदेशावरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़
पूर्णा येथील महात्मा फुले नगरातील एका २० वर्षीय महिलेने नांदेड येथील शेख इम्रान शेख इसाक व शेख इशरत शेख इसाक यांच्याशी लग्न न केल्याने २० ते २७ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत या दोघांनी पीडित महिलेच्या मोबाइलवर शिवीगाळ केली़ तसेच शेख इम्रान यांने पीडित महिलेच्या पतीच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लील भाषेत पोस्ट करून महिलेची बदनामी केली़ तसेच संसार उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला़ तसेच शेख इसाक शेख मुसा व शेख वसीम शेख इसाक यांनीही फेसबुकवर पीडित महिला व तिच्या बहिणीवर आरोप लावत बदनामी केली़ याप्रकरणी पीडित महिलेने पूर्णा न्यायालयात धाव घेतली होती़ याप्रकरणी न्यायालयाने २३ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालावरून २४ नोव्हेंबर रोजी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन शेख इम्रान शेख इसाक (रा देगलूर नाका नांदेड), शेख इशरत शेख इसाक, शेख इसाक शेख मुसा, शेख वसीम शेख इसाक (सर्व रा हैदरबाग देगलुर नाका नांदेड) या चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे़