विहिंपने दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:29+5:302021-05-28T04:14:29+5:30
यावेळी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर, सहायक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, वेशासं बाळू गुरू आसोलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्व हिंदू ...

विहिंपने दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे लोकार्पण
यावेळी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर, सहायक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, वेशासं बाळू गुरू आसोलेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री अनंत पांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. अंकित मंत्री, डॉ. ज्ञानेश्वर हरकळ, डॉ. विठ्ठल सिसोदिया, डॉ. जगदीश नाईक, डॉ. रणजीत लाड यांचीही यावेळी उपस्थिती होती.
याप्रसंगी अनंत पांडे यांनी विहिंपच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रल्हादराव कानडे, सुधीर सोनवलकर, राजकुमार भामरे, अभिजीत कुलकर्णी, गोपाळ रोडे, विद्या सोनुने, द्रौपदी गायकवाड, सुनील रामपूरकर, शिवप्रसाद कोरे, सुरेंद्र शहाणे, बापूराव सूर्यवंशी, तुकाराम दैठणकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. रामपूरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रोडे यांनी केले.
दरम्यान या मशीनने हवेतून ऑक्सिजन तयार केला जातो. २ ते ५ लीटर आवश्यकता असणाऱ्या ऑक्सिजन रूग्णास तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध होतो. सध्या उपलब्ध दहा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन्स गरजू रुग्णांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.