तंटामुक्ती योजनेला उतरती कळा
By Admin | Updated: May 2, 2017 04:45 IST2017-05-02T04:45:26+5:302017-05-02T04:45:26+5:30
राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेला जिल्ह्यात उतरती कळा लागली असून, तंटामुक्त गावांची संख्या

तंटामुक्ती योजनेला उतरती कळा
प्रसाद आर्वीकर /परभणी
राज्य शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेला जिल्ह्यात उतरती कळा लागली असून, तंटामुक्त गावांची संख्या घटत चालली आहे़ २०१६-१७मध्ये योजनेला १० वर्षे पूर्ण होत आहेत़
ग्रामीण भागात छोट्या छोट्या कारणावरून होणारे तंटे पोलीस ठाण्यापर्यंत न पोहचता गाव पातळीवरच मिटावेत आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने योजनेची अंमलबजावणी करण्यात आली़ पहिल्याच वर्षी जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समित्यांकडे १० हजार ५४२ तंटे दाखल झाले़ त्यापैकी ४ हजार ६८४ प्रकरणांमध्ये समेट घडवून ते गावपातळीवरच मिटविण्यात आले़
गेल्या १० वर्षांतील योजनेचा आढावा घेतला असता आता योजनेला अल्पसा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे़ २०१०-११ या वर्षांत योजनेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला़
या वर्षामध्ये ४६ गावे पुरस्कार प्राप्त ठरली होती़ त्यानंतर मात्र गावे कमी कमी होत आहेत. २०१२-१३मध्ये ४५ गावांना ‘तंटामुक्त गाव’ पुरस्कार मिळाला़ २०१३-१४मध्ये ३६, २०१४-१५मध्ये २०, २०१५-१६मध्ये अवघ्या चार गावांना तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाला आहे़
दाखल तंट्यांची संख्याही घटली
तंटामुक्त गाव योजनेला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच वर्षी या समित्यांकडे १० हजार ५४२ तंटे दाखल झाले़ मागील वर्षी केवळ ५ हजार १६ तंटे दाखल झाले.